Monday, January 12, 2026

सर्व विभागाच्या विभाग प्रमुख आणि शिक्षकीय कर्मचारी यांना सूचना

आपल्या संस्थेतील शिक्षक वर्ग महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षा विषयक कामकाजात सहभागी असतात. मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसंदर्भात गोपनीय कामासाठी संस्थेतील शिक्षक वर्गाची माहिती संकलित करण्यासाठी मंडळाच्या वेब पोर्टल वर Faculty data for Theory Exam related activities या नावाने लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. सदर लिंक MSBTE Home Page ---- Examination ---- MSBTE Theory Examination Portal वर Academic Monitoring Login मध्ये दि. ०५/०१/२०२६ ते दि. ०९/०१/२०२६ या कालावधीत उपलब्ध असेल. सदर लिंक मध्ये विभागनिहाय सर्व शिक्षकांची अचूक माहिती भरणे आवश्यक आहे.

प्रत्येक विभागप्रमुखांने त्यांच्या विभागातील सर्व शिक्षकांची माहिती भरुन पूर्ण झाल्यावर सदर माहितीची पुष्टी करणे आवश्यक राहील. तसेच सर्व विभागप्रमुखांनी विभागनिहाय माहिती पुष्टी केल्यानंतर प्राचार्यांनी सदर माहिती अचूक असल्याची खात्री करून पुष्टी करणे आवश्यक आहे. 

अधिक माहितीसाठी पुढील pdf document पाहावे.

https://drive.google.com/file/d/1ZanGBfqC_GjS2UV_WwWc5idNVtyID6Eh/view?usp=drive_link