स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून संस्थेमध्ये १२ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत “युवा सप्ताह (युवा सप्तह)” साजरा केला जात असून या सप्ताहाचे उद्घाटन स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने करण्यात आले. या संपूर्ण आठवड्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धात्मक व मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या युवा सप्ताहात खालील उपक्रमांचा समावेश आहे –
निबंध लेखन स्पर्धा
स्वच्छता अभियान
व्यक्तिमत्त्व विकास विषयावर व्याख्यान
प्रिसायस (संक्षेप लेखन) स्पर्धा
वक्तृत्व / भाषण स्पर्धा
